Homeक्राईमधक्कादायक! तलावात आढळला माय-लेकीचा मृतदेह, अपघात की घातपात..? वाचा

धक्कादायक! तलावात आढळला माय-लेकीचा मृतदेह, अपघात की घातपात..? वाचा

नांदेड,दि.१० फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माहुरच्या तलावात माय -लेकीचा मृतदेह आढळला फुलनबाई शिंकीराम मोरे आणि नर्मदा प्रकाश पजई असे मृत माय लेकीची नावे आहे. या बातमीने सध्या परिसरात खळबळ उडाली असून ही घटना घातपात की अपघात असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
परभणी जिल्ह्य़ातील चारठाणा येथून निघालेली 65 जणांची दिंडी घेऊन माहूर येथे पोहचली आहे. देवदर्शनानंतर ही दिंडी आज परतीच्या प्रवासासाठी निघत असताना फुलनबाई आणि नर्मदा या मायलेकी त्यामध्ये दिसल्या नाही. त्यामुळे दिंडी प्रमुखाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे.

त्यानंतर आज( १०, फेब्रूवारी) पांडवलेणी परिसरातील तलावात दोन मृतदेह सापडले असून ते मृतदेह फुलनबाई शिंकीराम मोरे आणि नर्मदा प्रकाश पजई या दोन मायलेकींचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे मृतदेह सापडल्यानंतर हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या निर्मनुष्य ठिकाणी या माय लेकी का गेल्या याचे गुढ अद्याप उकलले नाही. त्यामुळे हा घातपात आहे की, अपघात याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती पुढे येईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!