अहमदनगर,दि.७ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजाच्या विविध मागण्या संदर्भात एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना एकलव्य आदिवासी परिषद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे, योगेश माळी, प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे, पप्पू खुटसणे, विजय केळ, शोभा सोनवणे, कुल्याबाई पवार, उमेश बोर्डे, प्रमोद बारहाते, रवींद्र साळुंखे, संदीप ससे, संकेत सोनवणे, अनंत वाघ, मंगल पवार, अशा वाघ आदीसह आदिवासी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजाची खालील प्रमाणे मागणी मुर्शदपुर मांढरे वस्ती येथील गट नंबर 55/5. 55/6 मधील आदिवासी बौद्ध बहुजन समाजाचे अतिक्रमण शासनाने पुनर्वसन केल्याशिवाय काढू नये व कोपरगाव तालुक्यातील मंजूर हत्याकांडातील आरोपींना औरंगाबाद खंडपीठाने जामीन देताच पीडित कुटुंबाला धमकावणे जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याने त्याची जामीन रद्द करण्यात यावे. कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील नावे असलेली गायरान आदिवासी वस्ती मधील शेकडो वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न वीज पुरवठा पाणीपुरवठा रस्त्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे तसेच मंजूर गावात पीडित कुटुंब यांचे एकच आदिवासी समाजाचे घर असल्याने त्यांच्या जीविताला आरोपीपासून धोका असून त्यांचे सर्व शासकीय तरतुदीनुसार पुनर्वसन करावे व पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच पीडित कुटुंबाला पाच महिने उलटूनही अद्याप समाज कल्याण विभागाकडून आर्थिक मदत मिळाली नसून ती तात्काळ देण्यात यावी या विविध मागण्या संदर्भात एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे.