Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक १० फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक १० फेब्रुवारी २०२३)

जाणून घ्या आज शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

वृषभ – सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल.

मिथुन – आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

कर्क – मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

सिंह – घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

कन्या  घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

तुळ – ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

वृश्चिक – आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील.

धनु – व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. 

मकर – कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

कुंभ  गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल.

मीन  आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!