राहुरी,१ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगावच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व विस्तार शिक्षण विभाग अंतर्गत २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम खडांबे खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आला.
ध्वजारोहण मेजर नितीन कल्हापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या मध्ये गावातील प्रमुख पाहुणे सरपंच अण्णासाहेब माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे, अध्यक्ष व्ही.टी.हरिश्चंद्रे, यूवा नेतृत्व अमोल हरिश्चंद्रे,शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा विप्रदास, इतर सर्व शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमावेळी विद्यार्थी व कृषीकन्या कु.देशमुख स्वाती आणि कु. गुंजाळ मयुरी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर बक्षीस वितरण व खाऊ वाटपाचा कार्यक्रम कृषीकन्यांकडुन पार पडला. अश्या पद्धतीने सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल मारुती कुलट सर यांनी त्यांचे आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. के ससाने सर, कार्यक्रम समन्वयक डॉ. सी. एस. चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस. ए. अनारसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रेरणा भोसले, विषय तज्ञ कृषी विस्तार शिक्षण विभाग डॉ. ए. एम. चवई सर यांनी मार्गदर्शन केले.