दिकोंडा यांचे प्रतिपादन, मुक्त विद्यापीठ प्रमाणपत्र वितरणउत्साहात
अहमदनगर,दि.२० डिसेंबर,(प्रतिनिधी) – शास्त्रशुद्धपणे प्रशिक्षण व मार्गदर्शन घेतल्यावर योगशिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये विविध खासगी कंपन्या व अन्यक्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी योग शिक्षक पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन योगविद्या धाम संस्थेचे-संस्थापक अध्यक्ष दत्ता दिकोंडा यांनी नुकतेच येथे केले.
अहमदनगरच्या योग विद्या धाम येथे चालविल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमांतर्गत यावर्षी मे 2022 मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या योगशिक्षकांना पदवी प्रमाणपत्र देऊन दिकोंडा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष पांढरे, संस्थेच्या सचिव अंजलीताई कुलकर्णी, संस्थेचे कार्याध्यक्ष व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ वर्गाचे उपप्राचार्य जयंत वेशीकर, हेमंत आयचित्ते, माणिक आडाणे उपस्थित होते. यावेळी डॉ. नंदा राऊत, प्रणाली पाठक, घनःश्याम घाणेकर, संजय सुरसे, पूजा आहेर, पंकज डहाळे, सारिका डहाळे, शोभा धावणे, पल्लवी चौधरी व जयश्री गुंड यांना योगशिक्षक पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळीपुढील वर्षी योग शिक्षक वर्गासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी, योगाभ्यासक व योगप्रेमी उपस्थित होते. योग विद्या धाम मध्ये शास्त्रोक्त पद्धतीने योग अभ्यासक्रम शिकवला जातो तसेच योग शिक्षक या वर्गाबरोबरच योग प्रवेश, योग परिचय, योग प्रबोध, योगअध्यापक आणि मधुमेह नियंत्रण वर्ग, योग संजीवन वर्ग, उंची संवर्धन वर्ग अशा विविधविषयांच्या अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती यावेळीदेण्यात आली.