मुंबई,दि.२० मे २०२३ – महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहे. मुली बेपत्ता होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना देखील वाढताना दिसत आहे. अशात आता या सर्वांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मुली गायब होण्यामागे सोशल मीडिया कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज नाशकात पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी या प्रश्नावर भाष्य केलं आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर देखीस राज ठाकरे बोलले आहे.
या सगळ्या गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत आहेत. त्यावर ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे अनेक गोष्टींसाठी बुद्धीला चालना मिळते. हे काही नव्याने होत नाहीये. या आधी देखील अशा घटना घडल्यात. या आधी एका मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की, महाराष्ट्र पोलिसांना ४८ तास द्या. एकदा देऊन तर बघा मग असली प्रकरण घडतात का तेही समजेल, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्या कामासाठी मोकळीक दिल्यास कोणत्याही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल. तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याचा छडा देखील लगेच लागले, अशा आशयाचं वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे.