मुंबई, ३ मे २०२३ (ऑनलाईन वृत्त) – शरद पवारांनी यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सर्व्हे’ करण्यात आला आहे.
यातच एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली का? या प्रश्नाचं उत्तरही आम्ही सगळ्याच पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.या सर्व्हेमध्ये शरद पवार यांच्या घोषणेनंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल जाणून घेतला आहे. यात फक्त राष्ट्रवादी नाही तर इतर पक्षातील कार्यकर्त्यांचं मत देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
यात सर्व्हेत असा प्रश्न विचारण्यात आला की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली का? यावर खालील प्रमाणे लोकांनी आपली मत नोंदवली आहे.यात ५८ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपनं चूक केल्याचं म्हटले आहे. तर ३२ टक्के लोकांनी भाजपने चूक केली नसल्याचे म्हटलं अहे. तर ११ टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगता येत नाही, असे म्हटले आहे.