मुंबई, २ एप्रिल २०२३ –
भाजप नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार?.. काय त्यांची पात्रता आहे, अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘गांधी हा एक विचार आहे, तो विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं, असं आवाहन रोहित पवार यांनी भाजपला केलं होतं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला .या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरात भाजप शिवसेनेकडून राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.