मुंबई, ८ मे २०२३( ऑनलाईन वृत्त) – राज्यावर असलेले पावसाचे सावट अद्याप संपलेले नाही. या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. गेल्या महिनाभरापासून पडणारा अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. पुढच्या आठवडाभर राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांमध्ये आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील 3 ते 4 तासांत मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मोचा चक्रीवादळ तयार झालं आहे. यामुळे अंदमान, निकोबार, केरळ आणि तामिळनाडू या भागात 12 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या भागात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागाांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मोचा चक्रीवादळाचा प्रभाव आता हळूहळू दिसून येत आहे. मोचा चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागांमध्ये 8 ते 11 मे दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.
आठवडाभर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा….
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on