Homehealthहिवाळ्यात चेहरा दिवसभर मॉइश्चरायझर ठेवायचा आहे ? 'मग' जाणून घ्या

हिवाळ्यात चेहरा दिवसभर मॉइश्चरायझर ठेवायचा आहे ? ‘मग’ जाणून घ्या

हेल्थ , २० जानेवारी २०२३

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. अशातच अनेकांची त्वचा कोरडी आणि निस्तेज बनली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी आपण विविध प्रकारचे कपडे परिधान करतो.

पण जेव्हा गोष्ट त्वचेची येते तेव्हा आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पण थंडीत देखील तुमची त्वचा तजेलदार, कोमल आणि मुलायम राहू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या काही क्रीम सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कोरड्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

थंडी जसजशी वाढू लागते त्याप्रमाणे आपल्या त्वचेवर तिचा प्रभाव जाणवू लागतो. थंडीमध्ये देखील मुलायम राहण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टींचा वापर करत असाल. अशातच या गोष्टींच्या वापरामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर गेलेलं कोमलतत्व परत आणू शकता. जाणून घेऊया त्याबद्दल


1. आर्गन ऑयल

आर्गन ऑईल हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. तुम्ही तुमच्या त्वचेच्या काळजीसाठी (care) अशा क्रीम विकत घ्या. ज्यामधे अर्गन ऑईलचा समावेश असेल. या तेलामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) A , E , ओमेगा-6 , एंटीऑक्सीडेंट यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. आर्गण ऑईलला लिक्विड गोल्ड या नावाने देखील ओळखले जाते. आर्गन ऑयलच्या बेस्ट क्रीम, त्वचेला मुलायम बनवून सॉफ्ट आणि ग्लोविंग बनवते. यामुळे कोरडी त्वचा आणि फ्लेकी स्कीनचे प्रॉब्लेम दूर होतात.

2. ग्लिसरीन

ग्लिसरीन हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. ग्लिसरीनच्या नियमित वापरामुळे आपली कोरडी त्वचा अगदी मुलायम आणि सॉफ्ट बनते. ग्लिसरीन हे चेहऱ्याला मॉइश्चरायझर करून कोमल आणि चमकती त्वचा देते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत अशा प्रकारच्या क्रीम खरेदी (Shop) करा ज्यामधे ग्लिसरीन असेल.

3. बदाम तेल

बदामाचे तेल देखील आपल्या त्वचेसाठी फायदेशीर होऊ शकतात. बदामच्या तेलाने दररोज चेहऱ्याला मालिश केल्यास चेहऱ्यामधील कोरडेपणा नाहीसा होऊन जातो. विटामिन ई रिच बदाम तेल आपल्या स्किनला हील करते त्याचबरोबर नॅचरल ग्लो देखील आणण्याचा काम करते.

4. हायलूरॉनिक एसिड

ऍसिड त्वचेची आर्द्रता केवळ बंद करत नाही तर खोल पोषण प्रदान करतात. एवढेच नाही तर त्वचेच्या वृद्धत्वाची चिन्हे दूर ठेवण्यासही मदत होते. तुम्हाला बाजारात असे फेस मॉइश्चरायझर सहज मिळतील, ज्यामध्ये हे अॅसिड असते.

5. शिया बटर

शिया बटर हे देखील तुमच्या चेहऱ्याला मऊ ठेवण्यासाठी मदत करते. तुम्ही वापरत असलेल्या क्रीममध्ये शीया बटर असेल तर तुम्हाला वारंवार क्रीम लावायची गरज नाही. एकच एप्लीकेशनमध्ये तुमचा चेहरा दिवसभर कोमल आणि मुलायम राहतो. शीया बटरमध्ये काही असे पोषक तत्वे असतात. जे दीर्घकाळ चेहऱ्यावर मॉइश्चर पकडून ठेवतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!