बालकांच्या हस्ते फुड पॅकेटचे वितरण
अहमदनगर,दि.२७ डिसेंबर,(प्रतिनिधी) – शहरातील घर घर लंगर सेवेच्या वतीने वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्नछत्रालयात बालकांच्या हस्ते फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. मोहन थोलार, हरजीतसिंह वधवा, जनक आहुजा, राजेंद्र कंत्रोड, प्रशांत मुनोत, हरमनकौर वधवा, शौर्य गंभीर, तमन्ना तलवार, आंचल कंत्रोड, प्रीत कंत्रोड, पलक कंत्रोड, दलजीतसिंह वधवा, राजू जग्गी, गीत खुराणा, तन्वीर खुराणा, इशिका मेहसानी, श्रुती थोलार आदींसह लंगर सेवेचे सेवादार व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होती.
बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेहसिंहजी यांच्या धर्म रक्षण आणि सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ केंद्र शासनाच्या वतीने सोमवारी (दि.26 डिसेंबर) वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. या वीर बाल दिवसच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला. बालकांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने कोरोना काळात घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.