अहमदनगर,दि.३ मार्च,(प्रतिनिधी) – सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी (दि.4 मार्च) शहरातील न्यू टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य यांनी अहमदनगर शहरात आले असता, त्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.
नगरला आलेले सावता परिषदेचे आखाडे व वैद्य यांचा श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान व आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला.
यावेळी सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशनाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, माजी नगरसेवक अर्जुन बोरुडे, नाना गाडळकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, गणेश बोरुडे, उमेश धोंडे, लहू कराळे, मयूर भापकर, भालसिंग, भास्कर लोखंडे, नंदू रासकर आदी उपस्थित होते.