Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक ७ जानेवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक ७ जानेवारी २०२३)

जाणून घ्या आज शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो.

वृषभ – तुमचे आरोग्य चांगले राहील. आर्थिक जीवनात आनंद राहील. सुखद गोष्ट म्हणजे या आनंदासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकता.

मिथुन – तुमची समस्या गंभीर असली तरी लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत. कारण, यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही, असे त्यांना वाटत राहील

कर्क – आज तुम्ही तुमचे अतिशय आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. त्यामुळे दिवस आनंदात जाईल.

सिंह – आज तुम्हाला जाणीव होईल की, लग्नाच्या वेळी जी वचने दिली होती, ती खरी होती. तुमचा जोडीदारही खरोखरच तुमच्यावर निर्व्याज प्रेम करत आहे.

कन्या – सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असल्याचे तुम्हाला जाणवेल.

तूळ – आर्थिक स्वरूपाचा विचार केला, तर आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह-नक्षत्रांच्या चालीने तुमच्यासाठी धन कमावण्याकरिता सुवर्णसंधी चालून येईल.

वृश्चिक – अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करणे उत्तम. तसे केले नाहीत,तर तुमची समस्या अधिक गंभीर बनेल.

धनु – वैरभाव महागात पडू शकतो. आपल्या उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतो. आपल्या विचार करण्याच्या शक्तीलाही धक्का लागण्याची शक्यता आहे.

मकर – फूट पाडणारे विचार भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. वेळीच सावरा.

कुंभ – तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. तुमचे प्रेम सफल ठरेल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.

मीन – एक चकित करणारी छान भेटवस्तू आज तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद संभवतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!