जाणून घ्या आज गुरुवार दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आवडते काम करा.
वृषभ – तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा; परंतु मुलांसोबत अधिक गोडीगुलाबीने, उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होणार नाही.
मिथुन – तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करेल. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल.
कर्क – तुमचा निर्धार आणि मेहनतीकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल.
सिंह – आर्थिक हानी होण्याची शक्यता. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खासगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील.
कन्या – तब्येत एकदम उत्तम असेल. तुम्ही उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. आर्थिक फायदा संभवतो. दिवस आनंदात जाईल.
तूळ – अलीकडच्या काही दिवसांत तुमचे आयुष्य खडतर होते; पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला सुख मिळणार आहे.
वृश्चिक – कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो.
धनु – आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल.
मकर – संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. सहकार्यांचे सहकार्य मिळेल.
कुंभ – किमती वेळ मित्रांमुळे खराब कराल. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, या सगळ्याला तुम्ही पुरून उराल.
मीन – प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकता. प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे.