जाणून घ्या आज सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य
मेष : भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांची मदत घ्या.
वृषभ : चिंता निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून उखडून टाका. आर्थिक स्थिती चांगली राहील. कर्जापासून मुक्त होऊ शकता.
मिथुन : प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसर्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमाविषयी कुठलेही मत मांडू नका.
कर्क : बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक ओढाताण होईल. बोलताना विचार करा.
सिंह : तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करा. तुमचे व्यक्तिमत्त्व उजळेल. दिवस आनंदात जाईल. मित्रांचा सहवास लाभेल.
कन्या : दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करा. तरुणाईचा सहभाग असणार्या उपक्रमांत स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ.
तूळ : तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होत असतील, तर ते आता दूर होतील. मनोबल उंचावेल. दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक : दिवस ताणतणावात जाईल. मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. वडीलधार्यांचा मान ठेवा.
धनु : आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनाही वेळ देणे गरजेचे. धार्मिक कार्यात मन गुंतवाल.
मकर : प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल.
कुंभ : उद्योग-व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल.
मीन : भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल; परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही एकटे पडाल.