Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक २१ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक २१ फेब्रुवारी २०२३)

जाणून घ्या आज मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील.भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार-व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल.आर्थिक लाभ होतील.

वृषभ – अनावश्यक राग करू नका. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील. भागीदाराकडू सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींकडून कामाबद्दल सहकार्य मिळेल. कौटुंबिक सौख्य चांगले राहिल. संततीची प्रगती पाहून मन समाधानी होईल. आकस्मित धनप्राप्ती व प्रवासातून लाभ घडतील. कटुता निर्माण होईल असे बोलणे मात्र टाळावे. नवीन घर वाहन सुख मिळेल.null

मिथुन – लोकांशी संपर्क वाढवून आपण आपल्या योजना पुर्णत्वास न्याल. धर्मसत्ता राजसत्ते तिल लोकांपासून फायदा होईल. मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. रोजगारात आपल्या स्वभावाचा इतर गैरफायदा तर घेत नाहीत ना याकडे लक्ष दया.नवीन व्यापारात प्रगती होण्याचे संकेत मिळतील. व्यापारात नवीन संबंध प्रस्थापित होईल. मुलांच्या कामाकडे लक्ष द्या. घरातील सदस्यांची प्रगती होईल. देवयात्रा व तिर्थक्षेत्री प्रवास कराल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. आरोग्यही उत्तम राहणार आहे. संतती कडून शुभवार्ता मिळतील.

कर्क – थकित रक्कम वसुलीकरिता तगादा लावावा लागेल. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल.व्यापाराकरिता आजचा दिवस नुकसान हानीची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल.फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा.अपघात भय संभवते.

सिंह – विश्वासदर्शक वातावरण राहिल. स्वतःच्या प्रयत्नान समाजात मान मिळेल. शत्रूवर मात कराल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक स्थिति सुधारेल. कर्ज प्रकरणं मंजुर होतील. कोणताही टोकाचा विचार किंवा अतिरेकी वृत्ती टाळा. व्यसनापासुन दुर राहा. मित्रमैत्रिणित स्नेह वाढेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी आणि भावंडांबरोबर बरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. समिश्र स्वरुपाची फल देणारा दिवस राहिल.

कन्या – रोजगारात प्रगती कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर पत्नी व इतर सदस्यांकडून असहका मिळाल्यामुळे मन नाराज होऊ शकते. आपल्या लहान सहान इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती आवक झाल्याने काही समाधान लाभेल. गुप्तशत्रू पासुन सावध राहा.प्रवास शक्यतो टाळावा.

तूळ – बोलण्यावर संयम ठेवावा. हितशत्रुचा काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. धंदा व्यवसायात मोठ्या व्यवहारात पुरेशी काळजी घेणे हिताचे ठरेल.भागीदारीत अपेक्षित लाभ होयाचे योग आहेत. लेखन कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमसंबंधात जोडीदारांकडून भेटवस्तु मिळतील. कौटुंबिक सौख्य संतती विषयी समाधान व्यक्त कराल. पंचम स्थानातून होणार्या भ्रमणामुळे नवीन योजनेस चालना गती मिळेल. मान-सन्मान पुरस्कार मिळतील.

वृश्चिक – घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. आपली कार्यकुशलता व इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. जोडीदाराच्या व संततीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. वाहन घर खरेदीचा योग आहे. राजकिय व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.

धनु – नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल. रोजगारात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवाल. कामातली प्रगती पाहून समाधान व्यक्त कराल. संततीच्या दृष्टीने येणाऱ्या शुभवार्ता अभिमानास्पद ठरतील. व्यापारात दिनमान उत्तम आहे. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. आप्तेष्ट नातेवाईकांशी असलेले संबंध मर्यादित ठेवा. विचाराधीन असलेली कामे पार पडतील. मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल.प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होईल. पत्नीसोबत आर्थिक विषयावर वाद होण्याची शक्यताआहे.

मकर – मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कटुता निर्माण होईल असे बोलणे, वागणे टाळावे. अंहकारीवृत्तीला आळा घाला. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. काळजी घ्या.

कुंभ – सामाजिक कार्यात आपले योगदान राहिल. व्यापारिक निर्णयात मात्र गोपनीयता बाळगा. रोजगारात दिनमान उत्तम आहे. आर्थिक योजनावर चर्चा व्यापार-व्यवसाय चांगला चालेल. इतरांना न जमणारी कामे तुम्ही यशस्वीरित्या हाताळाल. त्यामुळे वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहिल. कार्यक्षेत्रात नवीन कामाच्या योजनेमुळे फायदा होईल. कटुता निमाण होईल, असे बोलणे मात्र टाळावेत. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या. मेहनतीचे उचित फळ मिळेल .

मीन – श्रमापेक्षा अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. सहनशीलता कमी होऊ देऊ नका. व्यापारात नवीन योजनावर कार्य सुरु होईल. नातेवाईकांबदल विचारात बदल होईल. मनाचा दाखविलेला मोठेपणा नातेसंबंधातील तेढ कमी करणारा ठरेल. मोठ्या व्यक्तींच्या सहकार्याने रोजगारात फायदा होईल. आपल्या अंगीभूत असणाऱ्या कलागुणांना वाव मिळेल. जोडीदार नोकरीत असेल तर वेतनवाढ, बढतीचे योग आहेत. गृहसौख्य उत्तम लाभेल.आरोग्याच्या तक्रारी होयाची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!