Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक २० जानेवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक २० जानेवारी २०२३)

जाणून घ्या आज शुक्रवार दिनांक २० जानेवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. देणी आल्यामुळे सांपत्तिक स्थिती सुधारेल. सामाजिक कामात रमाल.

वृषभ – नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर अडचणीत याल.

मिथुन – मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील.

कर्क – व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा सकारात्मक फळ देणारा ठरेल.

सिंह – विनोदबुद्धीमुळे एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. तुम्ही सांगू शकाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो.

कन्या – विचारपूर्वक पैसा खर्च करा. सुखद संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल.

तूळ – कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.

वृश्चिक – पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल.

धनु – कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही.

मकर – प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. तुमची जीवनशैली बदलायला हवी.

कुंभ – तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील. तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा.

मीन – योग्य लोकांसमोर कौशल्ये आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवलीत तर लवकरच तुमची सार्वजनिक प्रतिमा अधिक चांगली बनेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!