जाणून घ्या आज गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य
मेष – तुमचा प्रेमी तुमच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्या गोष्टी सांगणे जास्त पसंत करेल. ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकता.
वृषभ – तुम्ही एखाद्याला अप्रत्यक्ष मदत कराल. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यांपासून तुम्ही मुक्त व्हाल. दिवस आनंदात जाईल.
मिथुन – तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. मनावर ताबा ठेवा.
कर्क – वातावरण उत्साही बनेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. तुम्हाला इतरांना वेळ द्यावा लागेल.
सिंह – कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल.
कन्या – दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. कामाबाबत प्रामाणिक राहा. कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
तूळ – संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने चिंतीत राहू शकतात.
वृश्चिक – आशादायी वातावरण अनुभवास येईल. माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. मित्र मदतीला धावून येतील.
धनु – स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. बाहेरगावी जाणार्या व्यापार्यांनी पैसे सांभाळावेत, चोरी होण्याची शक्यता.
मकर – मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाल. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.
कुंभ – घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे. प्रेमाचा आनंद घेता येईल. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटेल.
मीन – कृतज्ञता व्यक्त करत पुढे चला. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शनदेखील सर्वांचा उत्साह वाढवू शकते. घरातील वातावरण आनंदी राहील.