Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक १८ जानेवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक १८ जानेवारी २०२३)

जाणून घ्या आज बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. अतिउत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल. उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.

वृषभ – वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे.

मिथुन – आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा. अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.

कर्क – लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल.

सिंह – कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील. झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कन्या – जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.

तूळ – दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका. खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

वृश्चिक – शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

धनू – विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा.

मकर – कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका. कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

कुंभ – काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका. आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल. घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल.

मीन – व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल. कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!