जाणून घ्या आज सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य
मेष – जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल.
वृषभ – तुम्हाला वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज.सहकार्यांना प्रोत्साहित करून कठोर परिश्रम करायला भाग पाडावे लागेल.
मिथुन – स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. प्रेयसीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल; परंतु कामामुळे तुम्ही तिला वेळ देण्यात यशस्वी होणार नाही.
कर्क – कुटुंबातील सदस्यांना जीवनात विशेष स्थान असेल. दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. सहजपणे समस्यांवर मात कराल.
सिंह – विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे कारण ठरेल.
कन्या – कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. मनोबल उंचावेल.
तूळ – दिवसभर चिंतेत राहू शकता. उद्योग, व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. क्षुल्लक वाद विसरून जा.
वृश्चिक – तुमच्याजवळील अनुकंपेचा गुण आणि समजूतदारपणा याची गोमटी फळे मिळतील. परंतु, घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे दबाव येणार नाही याची काळजी घ्या.
धनु – तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. देणी परत मिळवाल. नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका.
मकर – प्रेमात तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा.
कुंभ – सायंकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपला किती वेळ वाया घालवला. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.
मीन – घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे. शिस्तबद्ध, पण मुले नसलेले घर निर्जीव ठरते. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा.