जाणून घ्या आज गुरुवार दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजीचे आपले राशिभविष्य
मेष – तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा, यामुळे तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतील.
वृषभ – लोकांसोबत बोलण्यात आज बहुमूल्य वेळ वाया जाऊ शकतो. तुम्ही स्वतःला असे करण्यापासून रोखले पाहिजे.
मिथुन – कुणाला माहिती नसताना आज तुमच्या घरात कुणी दूरच्या नातेवाईकांचे आगमन होऊ शकते. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
कर्क – तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या.
सिंह – कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. लक्ष विचलित होईल.
कन्या – तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता कमी.
तूळ – स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा.
वृश्चिक – तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम. मनोबल चांगले राहील.
धनु – तुम्ही फायद्यात राहाल. बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. लोकांना तुमचे कौतुक वाटेल.
मकर – कामाच्या ठिकाणी इतरांचे नेतृत्व करा, प्रामाणिकपणे काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमची प्रगती होईल. दिवस आनंदात जाईल.
कुंभ – आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल. मात्र, त्याचवेळी खर्चाचे प्रमाणदेखील वाढलेले असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन – पैशाची कमतरता भासू शकते. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील.