नगर संचार हेल्थ विशेष,दि.१९ फेब्रुवारी २०२३ –
लाईफ पार्टनर सोबत स्पेशल डेट सुंदर बनवण्यासाठी जोडीदार प्रयत्न करत असतात त्यामूळे तुम्ही त्यांच्यासाठी सरप्राईज प्लान केले असेल तर. त्यासोबत खास दिसणे देखील तितकेच गरजेचे असते त्यामुळे आज आम्ही काही ब्युटी टिप्स घेऊन आलो आहोत.
तेलकट त्वचेसाठी या टिप्स फॉलो करा –
हिवाळयात त्वचेच्या समस्या अधिक जास्ती होत असतात.अशावेळी जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मुलतानी माती गुलाब जल मध्ये मिसळून पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्यावर लावून तुमच्या त्वचेचे समस्या कमी होऊ शकतात.
चेहरा जर नॉर्मल असेल तर मुलतानी मातीमध्ये दही आणि मध मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर ती पेस्ट चेहऱ्यावर लावा पंधरा-वीस मिनिटांनी लावलेले पेस्ट कोरडे झाल्याने पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
फेशियल स्क्रब वापरा –
फेशियल स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाण्यास मदत मिळते आणि चेहरा चमकदार होतो. त्यासाठी अक्रोड पावडर मध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दही मिक्स करून त्याचे स्क्रब बनवून घ्या.ते स्क्रब चेहऱ्यावर लावून साधारण पंधरा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
फेस पॅकचा वापर करा –
या दिवशी खास दिसण्यासाठी कढीपत्त्याचा वापर करून फेस पॅक तयार करू शकता. दोन चमचे सुकी कढीपत्ता, ओट्स दोन चमचे गुलाब जल आणि एक चमचा दही मिक्स करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक वापरताना डोळे आणि ओठ वगळून उर्वरित चेहऱ्यावर लावून ठेवा त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.
कॉटन वूल पॅड –
कॉटन वूल पॅडचा वापर करण्यासाठी ते गुलाब जल मध्ये बुडवून फ्रीजमध्ये पंधरा मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून हलक्या हाताने गालाच्या खालच्या आणि वरच्या बाजूला लावा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.
फ्रुट पॅकचा वापर करा –
एक बारीक चिरलेला सफरचंद, पपईचा लगदा,मॅश केलेल्या केळी,दही आणि लिंबाचा रस एकजीव करून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर अर्ध्यातासासाठी लावून ठेवा त्यानंतर चेहरा धुऊन घ्या त्यामुळे तुमचा चेहरा चमकदार दिसण्यात मदत मिळेल.