Homeदेश-विदेशकर्नाटकचा हा विजय काँग्रेससाठी नवसंजीवनी...

कर्नाटकचा हा विजय काँग्रेससाठी नवसंजीवनी…

कर्नाटक, १३ मे २०२३ – कर्नाटकमध्ये जवळपास निकाल स्पष्ट झाला आहे. कर्नाटमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसचा कर्नाटक विजय या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपकडे पाठ फिरवली आहे. तर काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पराभव सहन करत असलेल्या काँग्रेससाठी कर्नाटकचा विजय हा कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणारा ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा हा विजय काँग्रेसला 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीतही फायदा पोहोचवणारा ठरणार आहे.असं काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणं आहे. मात्र निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आपल्याला चित्र जरा वेगळे दिसते.मात्र त्यांचा हा निर्णय फसला आणि भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी भाजपचे मित्र पक्ष तेलुगु देसम पार्टी आणि जनता दल (युनायटेड) यांना एकही जागेवर खंतही उघडता आलं नव्हतं.

ही फक्त 2004 ची गोष्ट नाही. भारतीय मतदारांनी वारंवार दाखवून दिले आहे की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांसाठी त्यांची पसंती वेगळी आहे. दिल्लीतही आम आदमी पक्षाने 2013 पासून विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र 2014 किंवा 2019 मध्ये लोकसभेतच्या निवडणुकीत आपला यश मिळवता आलं नाही.यातच कर्नाटकातील भाजपच्या विजयाने 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मदत झाली नाही, ज्याने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचा विजय झाला. हेच चित्र पुन्हा एकदा 2024 मध्येही दिसू शकतं, असं तज्ज्ञांचे म्हणने आहे. असं असले तरी कर्नाटकचा हा विजय काँग्रेससाठी ‘नवसंजीवनी’ ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!