अहमदनगर, १ जून २०२३ – शहराच्या बाजारपेठेतील मोची गल्ली भागात असलेल्या महावीर स्टोअर्स या दुकानात पोलिसांना तलवारी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुकानातून पोलिसांनी सहा तलवारी जप्त केल्या. या तलवारी दुकानात विकण्यासाठी ठेवल्या होत्या की अन्य उद्देशाने ठेवल्या होत्या याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणी मालक नंदकिशोर मोडालाल बायड याला पोलिसांनी अटक केली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत विविध प्रकारची आंदोलने, वाद आणि कारवाया होत असल्याने पोलिसांची बाजारपेठेवर नजर आहे. अशातच मोची गल्लीतील महावीर स्टोअर्स या दुकानात बेकायेदशीररित्या तलवारीचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने पंचासह दुकानात जाऊन तपासणी केली त्यावेळी तेथे काऊंटरच्या खालील भागात सहा तलवारी आढळून आल्या आहेत.
या तलवारी पितळ धातूच्या आहेत. त्यावर “सिरोही की तलवार गँरटी ३० साल” असा मजकूर लिहिलेला आहे. पोलिसांनी दुकानमालक बायड यांच्याकडे या तलवारीसंबंधी चौकशी केली. मात्र, पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. या दुकानात महिलांसाठीची सौंदर्य प्रसाधने आणि भेटवस्तूंची विक्री केली जाते. अशा परिस्थितीत तेथे तलवारी कशा आल्या? याची चौकशी पोलिसांनी केली.
दुकान मालकाला भारतीय शस्त्र कायद्याचा भंग केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरात खळबळ, मोची गल्ली भागात असलेल्या महावीर स्टोअर्समध्ये आढळल्या तलवारी
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on