मुंबई,दि.१३ जानेवारी, – शिवसेना पक्षाचे नाव आण पक्षचिन्ह याचा निर्णय निवडणूक आयोग करणार आहे. चिन्ह कोणाचे ठाकरे गटाचे का शिंदे गटाचे याबाबत येत्या 17 जानेवारीला निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटाची सुनावणी पार पडणार आहे. 17 जानेवारीला शिंदे गटाच्या बाजूने निर्णय गेला तर ठाकरे गटाचा प्लान तयार असल्याची माहिती दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गटाने त्यादृष्टीनेही तयारी केली आहे. त्यांनंतर ठाकरे गट जनतेत जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गट जनतेतून पक्षाचे चिन्ह आणि नाव मागवणार आहे.
तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी करत आहे, अशी माहिती मिळत आहे. आमदार-खासदारांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सादिक अली खटल्यानुसार निकाल लागला तर शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार अशीही शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाने तशी तयारी केली आहे. ठाकरे गटाचा प्लॅन बी तयार आहे.