अहमदनगर,दि.१९ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – विविध कारणांमुळे सध्या वध्यत्वाचे प्रमाण वाढल्याने विवाहित दाम्पत्य आपत्य सुखापासून वंचित राहतात. अशा दाम्पत्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञान आता खूपच प्रगत झाले असुन. या आधुनिक तंत्रज्ञानाचा नगरकरांना लाभ मिळवून देण्यासाठी अरूणोदय हॉस्पिटल येथे नाशिक येथील प्रसिध्द टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञान तज्ञ डॉ. यशवंत माने पंधरा दिवसाला एक दिवस उपलब्ध राहणार असून. त्यांचा सत्कार करताना दंत रोग तज्ञ डॉ.सौ.वंदना फाटके समवेत स्त्री रोग तज्ञ डॉ.निलेश शेळके, एमडी मेडिसिन डॉ तुषार तनपुरे, आस्थी रोग तज्ञ डॉ निखिल गांधी, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे आधी उपस्थित होते.
अरुणोदय हॉस्पिटल येथे नाशिक येथील प्रसिद्ध टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान तज्ञ डॉ.यशवंत माने यांचा तपासणी व उपचार मार्गदर्शन होणार आहे.
डॉ.यशवंत माने हे स्पेशालिस्ट इन रिप्रॉडीक्टिव्ह मेडिसीन व एन्डोस्कोपिक सर्जरीमध्ये तज्ञ आहेत. ते एआरटी स्पेशालिस्ट म्हणून नाशिक येथील अथर्व इन्फर्टलिटी सेंटर येथे १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. एमबीबीएसनंतर त्यांनी ऑब्स्टेट्रिक्स व गायनॉकोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. यानंतर त्यांनी पाँडीचरी येथील प्रतिष्ठीत जेआयपीएमईआर येथे सिनियर रजिस्टार म्हणून प्रॅक्टिस केली. रिप्रॉडिक्टिव्ह मेडिसीनसाठी त्यांनी वेल्लोरे येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज येथे रजिस्टार म्हणून काम पाहिले. २००७ मध्ये त्यांनी डॉ. बी. एन. चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली रिप्रॉडक्टिव्ह मेडिसीनमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलोशीप मिळवली. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादर केले आहेत. अमेरिकेतील बोस्टन आयव्हीएफ सेंटर येथे त्यांनी प्रशिक्षण घेत कौशल्य विकसित केले.
अथर्व सेंटर येथे त्यांच्या प्रभावी उपचारांमुळे आतापर्यंत ५६५ बाळं, ४३१ जुळे आणि २ तिळ्यांचा जन्म झाला आहे. बंगलोर, मुंबई, पुणे, हैदराबाद, गुलबर्गा अशा शहरांमध्ये ते आयव्हीएफ कन्स्लटंट म्हणून सेवा देत आहेत. त्यांच्या अनुभवाचा नगर शहरासह जिल्ह्यातील दाम्पत्यांना लाभ होवू शकतो. तपासणी शिबीर घेत असून यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क ०२४१-२९७३३९९ / २९७५५९९/२९७६६९९, मो. ९७६७४४३३९९