Homeमनोरंजन'तेरव' चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च

‘तेरव’ चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च

विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत – नितीन गडकरी

अहमदनगर,(प्रतिनिधी) – “तेरवं” एकल महिलेच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘तेरवं’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा ट्रेलर लॉन्च संपन्न झाला.

विदर्भ मराठवाडा खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि ‘कॉटन सॉईल तंत्र’ या विषयावर या संदर्भात काम होणे गरजेचे आहे; पण श्याम पेठकर यांनी याआधी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या विषय अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडला होता आणि आता आगामी “तेरवं” या चित्रपटातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील त्या शेतकऱ्याची मागे एकटी उरलेली पत्नी म्हणजे एकल महिला यांच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट निर्माण केलेला आहे. विदर्भातील प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तमपणे केलेले आहे. व्यावसायिक कमाई करू न देणाऱ्या चित्रपटाच्या मागे निर्माता म्हणून उभे राहण्याची संवेदनशीलता ‘अंजनी कृपा प्रोडक्शनच्या’ माध्यमातून निर्माता श्री, नरेंद्र जीचकर यांनी दाखवली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून बघावा, असे आवाहन करतो, असे नितीन गडकरी म्हणाले.

हा चित्रपट पूर्णतः विदर्भाच्या भाषेत आणि ९०%च्या वर विदर्भीय कलावंत घेऊन करण्यात आलेला आहे. चित्रपटाचे छायांकन सुप्रसिद्ध छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांनी अत्यंत तळमळीने आणि आस्थेने केले, असे श्याम पेठकर म्हणाले. “आपल्या कृषी प्रधान संस्कृतीतील दुर्लक्षित घटक आपला कृषी म्हणजे शेतकरीच आहे..त्याच्या आयुष्यात कधीच हिरवळ दिसेना आणि आनंदाचा बहर येईना.. शेतकरी स्रीच जीवन देखील अशाच संकटांनी भरलेलं.. कधी एखाद मोठं संकट येईल की काय आणि आपला नवरा त्याचं जीवन संपवेल की काय याचं दडपण कायम तिच्या मनावर.. अशाच एका शेतकरी स्रीची संवेदनशील, मार्मिक कहाणी म्हणजे तेरवं.. अंधारातून मार्ग काढत प्रकाशाकडे जाणारी गोष्ट.. या चित्रपटात किरण खोजे यांना भेटा जनाच्या उत्कृष्ट ,लढवय्या अशा मुख्य भूमिकेत..जना नावाची एक सामान्य स्री जी तिच्या शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर अनेक अडचणींना सामोरे जाऊन,तिच्या व तिच्यासारख्या अनेक स्त्रियांच्या मूलभूत हक्कांसाठी व्यवस्थेशी लढा देते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून,जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देणारी…शेती – माती व स्त्री सन्मानाची एक सुंदर कथा..लवकरच येत आहे दिनांक ८ मार्च २०२४ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात…! हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांच्या जीवन संघर्षावर घेतलेला आहे आणि त्या संकटांना न घाबरता कसा लढा देतात हे या चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे या प्रस्थापित कलावंतांसह विदर्भातील मधुभैया जोशी, श्रद्धाताई तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे, दिलीप देवरणकर या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे. चित्रपटाचे थीम सॉंग ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिले आहे. आणखी दोन गाणी “तेरवं” या नाटकात शाम पेठकर यांनी लिहिलेली चित्रपटात घेण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिला व मुलींनी अत्यंत सुंदर भूमिका केलेल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!