Homeक्राईमदहा गोवंश जनावरांची कर्जत पोलिसांनी केली मुक्तता

दहा गोवंश जनावरांची कर्जत पोलिसांनी केली मुक्तता

राशीनच्या तिघांवर गुन्हा; कर्जत पोलिसांची स्तुत्य कारवाई 

कर्जत,दि.१३ डिसेंबर,(प्रतिनिधी) – कत्तलीसाठी एकत्रित क्रूरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल दहा गोवंश जनावरांची कर्जत पोलिसांनी मुक्तता केल्याने या जनावरांना जीवदान मिळाले आहे. मुक्त केलेल्या जनावरांना कामधेनू गोशाळेत दाखल करण्यात आले असून या प्रकरणी राशीनच्या तिघांवर पोलीस कॉन्स्टेबल फिर्यादीवरून कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिम इस्माईल कुरेशी, मुजाहित शकील कुरेशी, सोहेल गफार कुरेशी (तिघेही रा.राशीन ता.कर्जत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम १२(अ) (ब) ९ व महाराष्ट्र प्राण्यांना वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ३,११ (१) घ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका गुप्त माहितीदाराकडून कर्जत पोलिसांना कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. खाजगी वाहनाने घटनास्थळी दुपारी ३ वाजता छापा टाकला. त्यावेळी तिघा जणांनी दहा गोवंश जनावरांना चारा पाण्यापासून वंचित ठेऊन क्रूरपणे डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मिळून आलेली खिलार गोवंश जातीची अंदाजे १ लाख ३२ हजार किमतीची १० जनावरे कत्तलीसाठीच चालविली असल्याची खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांनी जागीच पंचनामा करून व जनावरे जप्त करून ती राशीन येथील जनजागृती प्रतिष्ठान संचालित ‘कामधेनू’ गोशाळेत मुक्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे,पो. ना. अमोल लोखंडे,पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!