अहमदनगर,दि.१९ जानेवारी – नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिली. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेत, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शुभांगी पाटील तर नागपूर येथून काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते व शिवसेना नेते अंबादास दानवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक संयुक्त पत्रकारपरिषद घेत याबाबतची घोषणा केली.
महाविकास आघाडीच्या घोषणेमुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण या तीन शिक्षक मतदारसंघांतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ५ जागांसाठी ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.