अहमदनगर,दि.२७ डिसेंबर,(प्रतिनिधी) – जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर व संग्राम संस्था संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमीत्ताने दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२२ रोजी संगमनेर येथे दिव्यांगांसाठीच्या जिल्हास्तरीय क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण समारंभात अहमदनगर अपंग कल्याणकारी मंडळाच्या जानकीबाई आपटे मुक बधिर विद्यालयाच्या विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकीसन देवढे, मा.सत्यजीत तांबे यांच्या हस्ते, दिनकर नाठे, राणी प्रसाद मुंदडा, सत्यजित तांबे, डॉक्टर अरविंद रसाळ, सूर्यकांत शिंदे, डॉक्टर नामदेवराव गुंजाळ, राजाभाऊ सोमानी,मुख्याध्यापक सुनिल कवडे, खेमनर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयाचे विद्यार्थी विविध क्रीडाप्रकारात यशस्वी झाले. यामध्ये ४०० मीटर धावणे- संदीप घुमरे २०० मीटर धावणे- निखील मलठे, लांब उडी- अमोल बडे गोळा फेक- अक्षदा कचरे, सिध्दांत दुधाले, पोहणे- अमोल बड़े, संदीप घुमरे या विद्यार्थ्यांची प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झालेली आहे.

तसेच दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्याकरीता आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत विद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी ‘श्रीकृष्ण लीला’ हा नृत्य कार्यक्रम सादर करून उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकून प्रथम क्रमांक मिळविला. या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत कु. आदिती पालवे, मिताली धूत, प्रिया सिंग, समीक्षा गांधी, सिध्दी रायकर, कोमल फुलारे, नेहा मोरे, वैष्णवी जपकर, ऋतुजा शेडगे, अक्षदा कचरे, चि. आदित्य भोसले, रोहित बोर्डे, सौरव यादव, अमोल बडे, निळकंठ देविकर, नैतिक नवले, मनिष गांधी व ऋषिकेश शेलार या विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विजय आरोटे, विशेष शिक्षक सुदाम चौधरी, कलाशिक्षक शिवानंद भांगरे, सहदेव कर्पे, संजय राठोड, श्रीमती पूनम गायकवाड, श्रीमती अर्चना देशमुख, श्रीमती ज्योती जाधव, अशोक शिंदे, सचिन घुमरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यासर्वांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी, सचिव डॉ ओजस जोशी व खजिनदार श्री विठ्ठलराव सुद्रीक यांनी अभिनंदन केले.