Homeनगर शहरमहाविकास आघाडीच्या सहाही जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना तयार

महाविकास आघाडीच्या सहाही जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना तयार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर दक्षिणेतील विधानसभा मतदारसंघातील सहाही जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने व्यक्तिगत संघटना म्हणून विशेष लक्ष केंद्रित केले असून याद्वारे पक्ष बळकट होणार आहे. या सर्व जागा मोठ्या फरकाने निवडून आणण्यासाठी पक्षाने व्यूहरचना तयार केली असून बूथ लेवल चा कार्यकर्ता हा घटक मानून तेथे काम करा त्या घटकाला केंद्रस्थानी ठेवा असा सल्ला काँग्रेस पक्षाचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचे ए आय सी सी नियुक्त निरीक्षक इंद्रविजय गोहिल यांनी दिला. नगरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. त्यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ हे उपस्थित होते त्यांनी गोहिल यांचे स्वागत आणि सत्कार केला. 

या बैठकीला नगर दक्षिणचे निरीक्षक गोहिल यांचे  प्रदेश काँग्रेस नियुक्त समन्वयक व श्रीगोंदा तालुकाध्यक्ष, प्रशांत दरेकर, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, पारनेर तालुका अध्यक्ष संभाजीराव रोहोकले, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, पाथर्डी तालुकाध्यक्ष नसिरभाई शेख, शेवगाव तालुकाध्यक्ष समीर काजी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीसाठी दक्षिण विभागातील  फ्रंटलचे अध्यक्ष,  जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, तालुका व शहर काँग्रेसचे निरीक्षक, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यासोबतच श्रीगोंदा,  कर्जत,  जामखेड या तालुक्यांची विभाग बैठक  दुपारी ४ वाजता श्रीगोंदा येथे झाली.   सदर बैठक संपन्न झाल्यानंतर तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी यांना  विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी देण्यात आली. 

निरिक्षकांनी मतदारसंघनिहाय कामकाजाचा आढावा घेतला. कोणत्या मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत आहे पंजा हे चिन्ह किती निवडणुकीत मतदारांना माहित आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संस्था संघटनांमध्ये पक्षाची पकड किती मजबूत आहे याचा देखील आढावा त्यांनी घेतला. 

संघटनात्मक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा किती मोठा संच गोळा केला आहे. त्यांच्या कामांचे स्वरूप किती व्यापक आहे. राजकारणाबरोबरच सामाजिक उपक्रमावर देखील विशेष करून भर दिला आहे की नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांचे सहकारी यांच्याशी कसे संबंध घनिष्ठ आहेत किंवा कोणत्या अडचणी आहेत. सामान्य जनतेच्या भावना, प्रश्न, समस्या कार्यकर्ते जाणून घेतात की नाही ते सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जातात की नाही याची देखील इत्यंभूत माहिती त्यांनी घेतली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या कार्यक्रमानुसार लवकरच विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून बूथ लेवल कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण मेळावा देखील लवकरच घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. 

    काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी दक्षिण मतदार संघाचे निवेदन केले. लोकसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस असा पाठिंबा आणि पाठबळ मिळालेले आहे त्यामुळे निलेश लंके यांच्या रूपाने खासदार जो सर्वसामान्य वर्गातला आहे तो देऊन आपण जायंट किलर ठरलो. आता नगर दक्षिणेत किमान तीन जागा पक्षाने पंजा या चिन्हावर लढवाव्यात त्या आपण निश्चितपणे जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ पक्षाला मिळत असून त्याद्वारे पक्ष संघटना मजबूत होत आहे. निवडणूक ही त्या निमित्ताने एक संधी आहे. मागील दहा वर्षात पक्षाला जो संघर्ष करावा लागला त्याचे विवेचन त्यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!