श्रीरामपूर, १९ मे २०२३ – श्रीरामपूर शहरात एका धार्मिक मिरवणुकीत अचानक दोन गटांत वाद होऊन दगडफेक झाली. यात काहीजण जखमी झाले आहे. श्रीरामपूर शहरात काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात एक धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक गोंधवणी परिसरातील कॉलनी जवळच आली असता घोषणाबाजी झाल्याने दोन गटांत वादावादी होऊन दगडफेक झाली. यात पळापळ होऊन काहीजण खाली पडले. यात अनेकजण जखमी झाले आहे. या भागात वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आहे.
मात्र या घटनेचे पडसाद दशमेश नगर व वॉर्ड नंबर दोनमध्ये झाले. दशमेश नगर भागात जमाव जमला होता. व्यावसायिकांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. वॉर्ड नंबर दोन मध्ये सुरू असलेल्या उरुसावर त्याचा परिणाम होणार नाही म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. वॉर्ड नंबर दोन मध्येही असलेल्या मिरवणुकीत काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. शिवाजी रोड येथे एका दुकानाजवळ जमाव जमला होता तेथूनही जमावास पोलिसांनी काढून दिले.
धार्मिक मिरवणुकीच्यावरून श्रीरामपुरात दगडफेक
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on