शेवगाव , १५ मे २०२३ –
अहमदनगरयेथील शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीमध्ये मोठा राडा झाला आहे. रविवारी रात्री ८ च्या सुमारास दोन गटात दगडफेक होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत. यात ४ पोलीसही जखमी झाले आहे. याप्रकरणी १५२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शहरात रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यामुळे अफवा पसरल्याने दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली.
गोंधळामुळे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद करावी लागली आहेत. जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली गेली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.