संगमनेर,६ जून २०२३ – संगमनेरात भगवा मोर्चाला गालबोट लागले आहे. मोर्चा पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवर असतांना संगमनेर जवळील समनापूर गावात दगडफेकीची घटना घडली आहे. या दगडफेकीत चार चाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर दोघे जण किरकोळ जखमी झाले आहे.
समनापूर येथे झालेल्या दगडफेकीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे.
दोन समाजाचे लोक एकमेकांवर दगडफेक करत होते. पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. झालेल्या दगडफेकीत दोघे जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलविले आहे. नेमके कोणत्या कारणामुळे ही दगडफेक झाली याचा पोलीस शोध घेत आहे. समनापूरमध्ये तणावाचे वातावरण आहे.
समनापूर मध्ये झालेल्या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आले आहे. याची तपासणी केली जाईल, दगडफेक करणार्यांना तातडीने अटक केली जाईल, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले आहे.
संगमनेरमधील ‘भगवा’ मोर्चात दगडफेक
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on