Homeमहाराष्ट्र'लवकरच मुंबईत बॉम्बस्फोट करणार', मुंबई पोलिसांना धमकीचा फोन..

‘लवकरच मुंबईत बॉम्बस्फोट करणार’, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन..




मुंबई, २३ मे २०२३ – मुंबईत बॉम्बस्फोट करणार मुंबई पोलिसांना धमकीचे फोन कॉल येणं किंवा ई-मेल येणं सुरुच आहे. आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना नुकताच एक धमकीचे ट्वीट मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी मुंबई पोलिसांना फोन किंवा इमेलद्वारे मुंबई हल्ल्याच्या धमकीची माहिती मिळाली नाही. तर ट्विटरवरुन ही धमकी देण्यात आली आहे. या ट्वीटनंतर मुंबई पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत बॉम्बस्फोट करण्याबाबतची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटवर सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका अकाऊटवरून ‘i m gonna blast the mumbai very soon’ असा इंग्रजी भाषेत धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. ‘मी लवकरच मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणार आहे. अशाप्रकारचा हा मेसेज आला आहे.

या धमकीच्या मेसेजची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबधित अकऊंटची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मुंबईत बॉम्बस्फोट करण्याच्या या धमकीच्या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस सतर्क झाले आहे. हा मेसेज नेमका कोणी पाठवला त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांना एकदा एका अज्ञात इसमाकडून अफवेचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने हाजीअली येथे 17 अतिरेकी येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती. पोलिसांनी त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!