पुढारी,दि.१८ जानेवारी,(प्रतिनिधी) – अकोले तालुका बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करीचे केंद्र बनले आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कळसुबाई – हरिश्चंद्र गड अभयारण्यातील उडदावणे परिसरात गेल्या दोन आठवड्यापुर्वी गावातील तीन चार जणाना बिबट्या मुत अवस्थेत आढळून आल्याने बिबट्याचे नखे आणि काही अवयव काढुन मोहटा जंगलात घटनास्थळीचं बिट्याला जाळुन पुरावा नष्ट करण्यात आला. आठवडा भरानंतर बिबट्याचे नख विक्रीसाठी आलेल्या तस्करांना शहापूरच्या वनविभागाने चांढे नाक्यावर नकली ग्राहक पाठवुन भाऊ गांगड वय ३४, काळु गि- हे वय २४, पांडुरंग उघडे रा.उडदावणे ताब्यात घेऊन बिबट्याची सहा नखे व मुद्देमाल जमा करण्यात आला. तसेचं शहापुर वनविभागाचे पथकाने तीन आरोपींना उडदावण्याच्या मोहटा जंगलात बिबट्या जाळण्यात आल्याच्या घटनास्थळी चौकशी करीता आणण्यात आले असता तपासात निष्पन्न झाले आहे.
परंतु कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यातील बिबट्या जाळण्यात येऊन नख्याची तस्करी झाल्याच्या घटनेने वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे नाशिक महामार्गावरील हॉटेल फाउंटन समोर साजिद सुलतान मनियार, शरद मोहन मधे व रामनाथ येसू पथवे रा शरणखेल ता.अकोले या तिघांकडून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले होते. अकोल्यातील बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी व शिकार करणा-या टोळ्या अकोले तालुक्यासह पुणे, ठाणे जिल्ह्यात सक्रिय असल्याचे वास्तव समोर आले आहे.बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी व शिकार करणा-या टोळ्यावर मात्र तालुक्यातील वनविभाग आणि वन्यजीव विभागाने लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
अकोले तालुक्यातील वनविभाग व अभयारण्यात बिबट्या,तरस,रान डुक्कर, मोर,ससा, निलगायी,गवा यांसारख्या वन्य प्राण्यांच्या जिवीताला धोका पोहचत असल्याने वन्य प्राण्यांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तर अकोले तालुक्यातील वनविभागाचे जंगलात आणि अभयारण्यातील जंगलात बिबटे,तरस,रानडुक्कर या प्राण्यांची संख्या दिवसेदिवस वाढताना दिसत आहे. तर बहुतांशी जंगलात खाद्य,पाणी,निवारा या मुलभूत गरजाची कमी पडत असल्याने वनप्राण्यानी जंगलाकडुन शहराच्या दिशेने वाटचाल केल्याने अकोले, निळंवडे,पाडाळणे, निब्रळ,राजूर परिसरात माणसासह शेळ्या,कुत्रे, कोंबड्या, गायीवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढल्याचे वनविभागाच्या रजिस्टरवर नोंदी वरुन दिसत आहेत.