हैद्राबाद,दि.१८ जानेवारी, – भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार द्विशतक झळकावले आहे. त्याने १४९ चेंडूत तुफानी फलंदाजी करत द्विशकत ठोकलं. यामध्ये १९ चौकार आणि ९ षटकार त्याने ठाकले. एकीकडे भारतीय फलंदाज बाद होत असताना शुभमन गिल याने एक बाजू सांभाळत तुफान फटकेबाजी करून आपले द्विशतक झळकवले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वन-डे सीरिजमधील पहिली मॅच, आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे.
यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९७ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांसह ११४ धावा केल्या होत्या. भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड समोर ३५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दोन्ही देशांमधील ही १७ वी वन-डे द्विपक्षीय सीरिज असेल. या आधी या दोन देशांदरम्यान एकूण १६ सीरिज खेळल्या गेल्यात. आता पुन्हा एकदा या दोन्ही टीम आमने-सामने असणार आहेत. दुसरीकडे, या सीरिजपूर्वी भारतीय टीमनं श्रीलंकेचा ३-० असा पराभव केला होता. त्याचवेळी न्यूझीलंडने पाकिस्तानचा २-१ असा पराभव केलाय.