Homeमहाराष्ट्रधक्कादायक,पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या

धक्कादायक,पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या

मुंबई, १३ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केली आहे. नालासोपाऱ्यात तुळींज जिल्हा परिषद शाळेजवळ सीता सदनमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून महिलेच्या पतीनेच केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नालासोपारा येथील तुळींज जिल्हा परिषद शाळेजवळ सीता सदनमधील दुसऱ्या मजल्यावरील रूम मध्ये राहणाऱ्या मेघा शहा (वय, 45) यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. याबद्दलची माहिती नागरिकांनी तुळींज पोलीस ठाण्यात दिली आहे. माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस पंचनामा सुरु आहे.

धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा पती पती हितेशने मेघाच्या आईला तुझ्या मुलीला मी संपवले असा मजकुर असलेला मेसेज केला होता.

हा मेसेज आल्यानंतर मृत महिलेच्या आईने खात्री करण्यासाठी घराच्या एजंटला फोन करून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. मात्र हि हत्या त्याने नेमकी का केली याबद्दलचे कारण अद्याप समोर आले नसून घटनेचा पुढील तपास नालासोपारा तुळींज पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!