राहुरी, ७ एप्रिल २०२३ (ऑनलाईन वृत्त) – मागील आठ दिवसांत तालुक्यातील तब्बल सहा मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार समोर आले आहे. त्यात महिलांसह अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. त्यामुळे, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राहुरी पोलिस ठाण्यात संबंधित पालकांनी फिर्यादी दिल्या आहेत.
राहुरी शहरातून गुरुवारी (ता. ४) रात्री बारा वाजता राहत्या घरातून १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी गायब झाली. त्याच्या एक दिवस अगोदर अशाच प्रकारे एका गावातून सोळा वर्षे सहा महिने वयाची अल्पवयीन मुलगी गायब झाली. आठवडाभरात विविध गावांत असेच प्रकार घडले. त्यात, एका ४२ वर्षांच्या महिलेसह सज्ञान मुलींचा समावेश आहे.किशोरवयीन शाळकरी मुलींना पाठलाग करुन, विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. लग्नाचे आमिष दाखवून पळवून न्यायचे. अशा प्रकारांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मागील वर्षी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शाळकरी मुलींना पाठलाग करून त्रास देणाऱ्या टवाळखोर तरुणांविरुद्ध मोहीम उघडली होती. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे, अशा प्रकारांना काहीसा चाप बसला होता. परंतु, पोलिस निरीक्षक दराडे यांच्या बदलीनंतर निर्भया अभियान थंडावले. पोलिसांनी पुन्हा ‘निर्भया अभियान’ राबवून अल्पवयीन मुली व महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.
धक्कादायक! राहुरीत आठ दिवसांत सहा मुली गायब
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on