अहमदनगर,दि.१९ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त बाबा वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत फळाचे वाटप करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील, उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन, सरचिटणीस अशोक औषिकर, सहचिटणीस लतीफ शेख, खजिनदार गणेश आटोळे, सुदाम देशमुख, मनपाचे अभियंता सुरेश इथापे, किरण बोरुडे, अँड.अनुराधा येवले, अँड.अनिता दिघे, छावा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, इलाहीबश बागवान, राजू पवार, गणेश गांगर्डे, पोपट कांडेकर, सुनील करपे, सोपान दळवी, अमोल कवडे, रवी वाघचौरे, किशोर कुलट, बाळासाहेब बेल्हेकर, दीपक गहिले, राहुल गहिले, अमोल व्यवहारे, महादेव कोतकर, प्रताप दीक्षित, शांता ठुबे, सुरेखा कडूस, शर्मिला कदम, मीनाक्षी जाधव, अजिता एडके, शोभा भालसिंग आदी उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले म्हणाले की अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने संघटनेचे पदाधिकारी हे जेथे गरज आहे तेथे मदत करतात व संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात रिक्षावाला हा कधीच उपद्रव्य नसतो कारण त्याच्यामागे संघटना असती व संघटनेचा नाव खराब होणार नाही असे कृत्य रिक्षावाला कधीही करत नाही व रिक्षावाल्याबद्दल आजपर्यंत महिला विषयी कोणतेही अनुचित प्रकार कधीही घडलेले नसून अर्ध्या रात्री देखील महिला ही सुरक्षित असल्याची भावना ठेवत रिक्षाचालक हा आपला व्यापार करत असतात त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे एका समाजाचे नसून सर्व समाजावर आदर बंधुत्व प्रेम करणारे होते त्यानिमित्ताने आज हा संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास कराळे यांनी केले तर आभार दत्ताभाऊ वामन यांनी मांनले.