मुंबई, ५ मे २०२३( ऑनलाईन वृत्त) – शरद पवार आपला राजीनामा मागे घेणार आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळालाय मिळाली आहे. वर्षभरानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. यामुळे वर्षभर तरी शरद पवार हेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष राहातील.
आज सकाळी जी बैठक झाली त्यामध्ये नेमण्यात आलेल्या समितीने पवारांचा राजीनामा स्वीकारला नाही. यानंतर या समितीने विनंती केली होती की, ‘तुमचा राजीनामा स्वीकारला नाही, तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे.’ सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील वर्षभर शरद पवार हेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष राहणार आहे. पवार हेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष राहणार आहे.