२ मे २०२३ ( ऑनलाईन वृत्त) –
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सध्या मुंबईत सुरू होता. याच कार्यक्रमात कुठे तरी थांबायचे विचार केला पाहिजे,असे म्हणत शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन आज मुंबई येथे होत आहे. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. १ मे १९६० रोजी माझी सार्वजनिक ६३ वर्षे पूर्ण झाली आहे. त्यातील ५८ वर्षे मी राजकारणात राहिलो यानंतर आता केवळ तीन वर्षे राहिली आहे. असे म्हणत त्यांनी अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर सभागृहात चांगलेच गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यावेळी हा निर्णय मागे घ्यावा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार निवृत्त होणार,नवीन अध्यक्ष कोण?
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on