Homeनगर शहरलोकनेते स्व.शंकरराव घुले यांचा चरित्र ग्रंथ 'संघर्ष गाथा'चे शरद पवार यांच्या हस्ते...

लोकनेते स्व.शंकरराव घुले यांचा चरित्र ग्रंथ ‘संघर्ष गाथा’चे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन 

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ अधिवेशनात होणार प्रकाशन

अहमदनगर,दि.२१ मे २०२३,(प्रतिनिधी) – नगरच्या मार्केट यार्ड मधील फळे भाजीपाला विभागाच्या प्रांगणात पार पडणाऱ्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनात नगर जिल्हा हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष पैलवान लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या जीवनकार्याचा हृदयस्पर्शी वेध घेणाऱ्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. अधिवेशनाचे उदघाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते ‘संघर्ष गाथा’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन केले जाणार आहे. 

नगर जिल्हा हमाल पंचायतचे विद्यमान अध्यक्ष अविनाश घुले यांच्या संकल्पनेतून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. नगर शहराच्या पुढील वाटचालीत नव्या पिढीला मोलाचे मार्गदर्शन करणारा हा संदर्भ ग्रंथ ठरणार आहे. गणराज प्रकाशनचे प्रा. गणेश भगत यांनी या चरित्र ग्रंथाचे लेखन व  संकलन केले असून गणराज प्रकाशनाचे हे १८५ वे पुस्तक आहे. यात लोकनेते शंकरराव घुले अण्णांचे प्रकाशित साहित्य, अण्णांचे संपादित चरित्र दर्शन, त्यांच्या विषयीच्या विविध क्षेत्रातील समाज मान्यवरांच्या भाव भावना, वर्तमान पात्रातील कात्रणे, फोटो आणि ठळक जीवनपट अशा चार भागात हा ग्रंथ विभागला गेला आहे. एकूण ३०३ पानांचा हा समृद्ध व वाड:मयीन ग्रंथ तयार झाला आहे. श्रमिकांच्या पोटाची ज्यांनी चिंता वाहून श्रमिकांच्या न्यायासाठी ज्यांनी संघर्ष लढा उभारला आणि आपले संपूर्ण आयुष्य हमाल कामगार, अंग मेहनती आणि कष्टकरी भारवाही गोरगरीब समाजासाठी वाहिले असे संघर्ष गाथा नायक अण्णा यांच्या पवित्र स्मृतीस हा ग्रंथ अर्पित करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!