मुंबई, दि.३ फेब्रुवारी २०२३ –
बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू आहेत. त्यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आता आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांवर आलियाचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
रिझवान सिद्दीकी यांनी आपल्या निवेदनात म्हटले, ‘नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझी क्लायंट आलिया सिद्दिकीला घरातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. त्यांनी आलियाचा खूप छळ केला आणि तिच्याविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी आलियाला अटक करण्याची आणि रोज संध्याकाळी पोलिस ठाण्यात येण्याची धमकी दिली आहे.
‘पोलिसांच्या कृती आणि वागणुकीसाठी मी त्यांना थेट जबाबदार ठरवणार नाही, तरीही वस्तुस्थिती अशी आहे की, आलियाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी कोणताही पोलिस अधिकारी कधीही आला नाही. पोलिस अधिकाऱ्यांसमोर तिचा अनेकदा अपमान करण्यात आला आहे. एवढेच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या तिच्या नातेसंबंधावर पोलिस अधिका-यांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. या सर्व प्रकारानंतरही पोलिस अधिकाऱ्यांनी माझ्या क्लायंटने दिलेल्या लेखी तक्रारीवर आयपीसी कलम 509 अन्वये कारवाई केलेली नाही.’
‘नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या क्लायंटला सात दिवसांपासून जेवण दिले नाही. झोपायला पलंग आणि वापरायला बाथरुम दिले नाही आहे. त्यांनी आलियाभोवती अनेक अंगरक्षकही तैनात केले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहे. सध्या माझी क्लायंट तिच्या मुलांसह हॉलमध्ये राहात आहे.
आलिया आणि नवाजच्या आईमध्ये मालमत्तेवरून वाद सुरु आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. काही दिवसांपूर्वी नवाजच्या आईने आलियाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी भादंवि कलम 452, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता.नवाजुद्दीनच्या पत्नीचे खरे नाव अंजना किशोर पांडे होते. मात्र लग्नानंतर तिने तिचे नाव बदलून आलिया जैनब ठेवले.
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचे गंभीर आरोप
Recent Comments
Hello world!
on