सहजयोग कार्यक्रम समर्थ शाळा सावेडी येथे संपन्न
अहमदनगर,दि.१२ डिसेंबर,(प्रतिनिधी) – समर्थ मंदिर प्रशाला, सावेडी व अहमदनगर सहजयोग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सहजयोग ध्यान साधना व कुंडलिनी शक्ती जागृती चा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलतांना जेष्ठ सहजयोगी अविनाश महाजन म्हणाले प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधना ही जगातील 150 पेक्षा जास्त देशात विनामूल्य स्वरूपात व विनसायास चालू असून या ध्यान साधनेचा उपयोग जास्तीत जास्त विदयार्थ्यांना होत आहे. या साठी विदयार्थ्याने रोज नित्य नियमाने ध्यान केल्यास त्याच्यात एकाग्रता निर्माण होऊन स्मरणशक्ती वाढते व त्यांची अभ्यासात प्रगती होते.
कार्यक्रम ची सुरुवात समर्थ शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती संगीता जोशी मॅडम व पर्यवेक्षिका सौ. संगीता सोनटक्के यांनी सहजयोग परिवारातील सदस्यांचे स्वागत केले. जिल्हा समन्वयक समन्व्यक श्रीनिवास बोज्जा यांनी कार्यक्रम चे प्रास्ताविक केले तर सहज अनुभूती जेष्ठ सहजयोगी अंबादास येन्नम यांनी दिली. सदरहू कार्यक्रमांस सहजयोगी प्रा. वसंत गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेतील शिक्षक विवेक भारताल, अरुण राशीनकर, अमोल बागुल, सौ. ऋता अकोलकर, सौ.अंबाडे, कु. स्वप्ना कुलकर्णी, पथवे, कानडे, सातपुते यांनी सहकार्य केले. यावेळी सहजयोग परिवारातील मेजर कुंडलिक ढाकणे, राजेंद्र द्यावनपेल्ली विशाल संभार, रवींद्र आगरकर, श्याम सुद्रिक, विनायक जोग, श्रीमती जनाबाई बुरा, मा. नगरसेविका वीणा बोज्जा, श्रीमती जयश्री सामलेटी आदी उपस्थित होते.