अहमदनगर,दि.४ ऑगस्ट,(प्रतिनिधी) – सावडी उपनगर भागातील माऊली संकुल चौक ते टीव्ही सेंटर चौकापर्यंत रस्ता पॅचिंग कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी या रस्त्या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्याकडे या कामाबाबत पाठपुरावा केला होता. अखेर या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याचा शुभारंभ आज मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ.सतिष सोनवणे व मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी डॉ.सुहास वाळेकर, सचिन जगताप, डॉ.वैभव भोयटे, सुनील गाबरा, योगेश मालपाणी, पुनित दुग्गल, अशोक मीरपगार, विलास उडाले, आनंत काळे, अरविंद काळे, गोवर्धन जाधव, संजय छाब्रा,प्रविण शेठ अजमेरा, सचिन गोरे, संजय जधावर, अशोक चौधरी,हर्षल बांगर, शुभम भोसले, वाघमारे सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.