Homeदेश-विदेशडुलकी लागल्याने ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाल्याची शक्यता

डुलकी लागल्याने ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाल्याची शक्यता

अहमदनगर,दि.३० डिसेंबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – भारताचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झालाय. दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार दुभाजकावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच अपघातानंतर गाडीने पेट घेतल्याने गाडी जळून खाक झालीये. ऋषभ पंत हाच स्वत: गाडी चालवत होता. झोपेत असल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी रस्त्यावरील लोखंडी रेलिंग तोडून दुभाजकावर जोरात आदळली. यादरम्यान कित्येक वेळा गाडीने पलटी मारल्या. गाडीने रेलिंगला जोरदार धडक दिल्याने कारला आग लागली. कारचा बोनेटसह पुढचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मात्र, ऋषभ पंत आणि त्याच्या मित्रांना वेळीच गाडीतून बाहेर पडता आले आणि त्यांचा जीव थोडक्यात वाचला. कारला आग लागल्यानंतर ऋषभ पंतने स्वत: कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर दुखापतीमुळे तो बाहेर पडू शकला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज पंत कारमध्ये एकटाच होता. आज पहाटे ५.३० च्या सुमारास त्याची मर्सिडीज जीएलई कार दिल्ली-हरिद्वार महामार्गावरील दुभाजकाच्या रेलिंगला धडकली. त्यानंतर कारला आग लागली. या अपघातानंतर जवळच्या गावातील लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला डेहराडूनमधील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती हरिद्वार ग्रामीणचे पोलीस अधीक्षक स्वप्न किशोर सिंह यांनी दिली.

पंतच्या कपाळावर, हाताला आणि उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पण, तो शुद्धीत असून बोलू शकतो. तो चालवत असलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने तो या भीषण अपघातातून बचावला आहे असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यावर पहाटे कुठेही धुके नव्हते. पण कार चालवताना पंतला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले असावे, अशी शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंतला डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली आहे. पाठीवर आणि उजव्या गुडघ्यालालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जळालेली कार पुढील तपासासाठी नेण्यात आली आहे. कारमधील एअरबॅग उघडली होती की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!