महिलांना घराबाहेर पडणे झाले अवघड
अहमदनगर,दि.१६ मार्च,(प्रतिनिधी) – शहरातील माळीवाडा बस स्थानक ते माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई करुन त्यांना हद्दपार करण्याची मागणी बौद्ध वस्ती व माळीवाडा परिसरातील नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. वेश्या व्यवसाय करणार्या महिलांमुळे परिसरातील महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, परिसरातील महिलांकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी यावेळी केली.

नागरिकांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.15 मार्च) ऋषी विधाते, प्रथमेश विधाते, ओम भिंगारदिवे, शिवम साठे, आशिष वैराळ, राहुल भिंगारदिवे, दर्शन भिंगारदिवे, सौरभ भिंगारदिवे, अनिकेत वैरागर, अॅड. सिध्दांत शिंदे, रीमा भिंगारदिवे, अंजली विधाते, रेश्मा भिंगारदिवे, उज्वला विधाते, माया निळे, मीना मोरे, आकाश मोरे, स्नेहा घंगाळे, सुमन घंगाळे, मोनिका लोखंडे, निलेश रंधिवे, सरस्वती नवगिरे, सीमा सोनवणे, वंदना लोखंडे, करिश्मा विधाते, मानसी विधाते आदी माळीवाडा परिसरातील नागरिक व महिला मोठ्या उपस्थित होत्या.
माळीवाडा बस स्थानक ते माळीवाडा परिसरात अनेक अवैध धंदे सुरु असून, त्यांची अनेकवेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रार करुनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. या परिसरात इतर ठिकाणाहून येऊन मोठ्या संख्येने महिला वेश्या व्यवसाय करत आहे. यामुळे या भागातील महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महिलांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. वेश्या व्यवसाय करणार्या महिलांकडे पाहून रस्त्यावर येणारे पुरुष अश्लिल हावभाव करत असतात. परिसरातील महिला व महाविद्यालयीन युवतींना शाळा, महाविद्यालयात जाणे अवघड झाले असून, या सर्व गोष्टींचा लहान मुला-मुलींवर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरातील माळीवाडा बस स्थानक ते माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई करुन त्यांना हद्दपार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.