राहुरी,(प्रतिनिधी) –
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावरील दुभाजकावर देवळाली प्रवरा नगरपरिषदेचेवतीने पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. या पथदिव्यांची मागील दहा ते बारा वर्षांपासून नूतनीकरण करण्यात आलेले नाही. हे स्ट्रीट लाइट रात्री चालू केल्यानंतर त्यांचा प्रकाश एकदमच मंद अवस्थेत पडलेला दिसतो.त्यामूळे या रस्त्यावर ये-जा करणा-या जड वाहतूकीस रात्रीचे वेळेस स्वतःची वाहने चालविताना फारच अडचणींचा सामना करावा लागतो. थोड्याच दिवसांनी पावसाळ्याची सूरूवात होणार आहे. यावर्षी पावसाळा लवकरच सूरू होण्याच्या मार्गावर असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे वतीने ह्या स्ट्रीट लाइट चे नूतनीकरण करण्यात यावे, भविष्यात होणाऱे अपघात या नूतनीकरणामूळे टळू शकतील याचा विचार करता हे स्ट्रीट लाइटचे नूतनीकरण लवकर करावे.
याच मार्गावर राजशिष्टाचार पाळणा-या शासकीय वाहनांची सूद्धा ये-जा असते,तसेच या स्ट्रीटलाइटची चांगल्या दर्जाची वायरींग, उच्च दर्जाची लाइटचे साहित्य वापरून ही दुरूस्ती करावी. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तसेच प्रवास करणा-या नागरीकांना हा त्रास कमी होईल असे निवेदन फ्रिडम पॉवर पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र साळवे यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना दिले आहे.