अहमदनगर,दि.२४ जानेवारी,(प्रतिनिधी)– शहरात शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आयटीआय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करुन त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, संपर्क प्रमुख सचिन जाधव, नगरसेवक संग्राम शेळके, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे, तालुका प्रमुख संग्राम शेळके, अभिषेक भोसले, योगेश गलांडे, अमोल हुंबे, महेश लोंढे, आशिष शिंदे, ओमकार शिंदे, रविंद्र लालबोंद्रे, शुभम पारधे, प्रल्हाद जोशी, विशाल शितोळे, अक्षय ठाणगे, राज कोंडके, शंकर शेळके, बाळासाहेब ठुबे, आनंदराव शेळके, आदेश बचारे, इमरान शेख, ऋषीकेश सैंदर, गणेश कंठाळे, पवन कुमटकर, शेखर तांदळे, प्रशांत डावरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा राष्ट्रभक्तीचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जात आहे. या पक्षात बाळासाहेबांचे निष्ठवान कट्टर सैनिक एकवटले आहेत. स्व. बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या कल्याणाचा विचार केला. सत्तेची सूत्र देखील सर्वसामान्यांच्या हातात दिली. महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांनी जागा केला. हेच स्वाभिमान घेऊन शिवसेना सत्तेच्या माध्यमातून कल्याणकारी राज्य चालवित असल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोतच होते. मराठी माणसांची अस्मिता जपण्याचे काम त्यांनी केले. सडेतोड वक्तृत्व, अफाट संघटन कौशल्य व जन हिताचा विचार करुन त्यांनी दिलेले विचारांपुढे सर्व नतमस्तक आहेत. कोणतेही पदं न स्वीकारता ते सर्वांच्या हृदयात घर करून गेले असल्याचे त्यांनी सांगितले.